About Us

ठाणे महानगर पालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव आणि कै . यशवंत रामा साळवी तरण तलावांचे नवीन वार्षिक प्रवेश अर्ज सोडण्याबाबत खालील प्रमाणे :

ठाणे महानगर पालिकेच्या कै. यशवंत रामा साळवी तरण तलाव मनिषा नगर कळवा व कै. मारोतराव शिंदे तरण तलाव ठाणे येथे नविन प्रवेश अर्ज ऑनलाईन द्वारे दि. १४/०१/२०१९ ते दि. १९/०१/२०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करण्यात येत आहे..

एकूण अर्जांपैकी २०० अर्जदारांसाठी लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्यात येईल. सदर सोडत गडकरी रंगायतन या ठिकाणी दि. २२/०१/२०१९ रोजी ११. ०० वाजता करण्यात येईल. .

लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या एकूण फक्त २०० सभासदांनी संबंधित तरण तलाव कार्यलयात रोख /धनादेशाद्वारे दि. २५/०१/२०१९ ते दि. २३/०२/२०१९ या ३० दिवसांचे कालावधीतच प्रवेश घेणे आवश्यक असून तदनंतर / मुदतीनंतर प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. .

प्रवेश घेताना रेजिस्ट्रेशन फॉर्मची प्रत,जन्म दाखला / वयाचा दाखला विहित नमुन्यातील वैद्यकीय दाखला, व एक पासपोर्ट साईज फोटो सादर करणे आवश्यक आहे. .

ऑनलाईन अर्ज सादर करणे बाबत अथवा इतर माहितीसाठी हेल्पलाईन क्र . ८९२८१०७०९९ वर सकाळी १०. ०० ते ०६.०० या कालावधीत संपर्क करणे . .