ठाणे महानगर पालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव आणि कै . यशवंत रामा साळवी तरण तलावांचे नवीन वार्षिक प्रवेश अर्ज सोडण्याबाबत खालील प्रमाणे :

मागील सहा महिन्यामध्ये ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेले सभासदांनी ऑगस्ट महिन्यामधील ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा अर्ज करणे बंधनकारक राहिल.

ठाणे महानगर पालिकेच्या कै. यशवंत रामा साळवी तरण तलाव मनिषा नगरा कळवा व कै. मारोतराव शिंदे तरण तलाव ठाणे येथे नविन वार्षिक प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने दि. 25/08/2019 ते दि.31/08/2019 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज स्विकारण्यात येतील.

एकुण अर्जांपैकी 250 अर्जदारांसाठी लॉटरी पध्दतीने प्रवेश देण्यांत येईल. सदर सोडत गडकरी रंगायतन ठाणे या ठिकाणी दि. 13/09/2019 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यांत येईल

लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या एकुण 250 सभासदांनी संबधित तरण तलाव कार्यालयात रोख / धनादेशाव्दारे दि. 15/09/2019 ते दि. 15/10/2019 या तीस दिवसांचे कालावधीतच प्रवेश घेणे आवश्यक असुन मुदतीनंतर प्रवेश देण्यांत येणार नाही याची नोंद घ्यावी.

प्रवेश घेताना रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रत, जन्म दाखला/ वयाचा विहित नमुन्यातील वैद्यकिय दाखला, व दोन पासपोर्ट साईज अद्यावत फोटो सादर करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय व जन्म दाखल्याची प्रत वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन द्यावी.

ऑनलाईन अर्ज सादर करणे बाबत अथवा इतर माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 8928107099 वर स‍काळी 10.00 ते 6.00 या काळावधीत संपर्क करणे

हेल्पलाईन नंबर दि. 25/8/2019 ते दि. 31/8/2019 या कालावधीमध्ये चालू ठेवण्यात येईल. याची दखल घ्यावी